उमरगा :- येथील भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रीय युवक काँग्रेस धाराशिव जिल्हाध्यक्ष अश्लेष शिवाजीराव मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय कबड्डी कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन धाराशिव जिल्ह्याचे माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांच्या शुभहस्ते आणि भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल शिवाजीराव मोरे यांच्या उपस्थित झाला.उमरगा येथील कै शिवाजीराव दाजी मोरे क्रीडा संकुलामध्ये 3 मार्च ते 6 मार्च दरम्यान राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ग्रामीण भागातील युवकांनी कबड्डी आपल्या पारंपरिक खेळाचा विस्तार करावा असे आव्हान उद्घाटनपर भाषणात प्रा गायकवाड यांनी केले यावेळी पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले भारत शिक्षण संस्थेचे सचिव पद्माकरराव काका हराळकर, सहसचिव डॉक्टर सुभाष वाघमोडे, संचालक भानुदास माने, रामराव इंगोले, दिगंबरराव बिराजदार, अशोक पाटील, राजेंद्र माने, रमेश बिराजदार, शिवसेना पक्ष निरीक्षक युवा नेते किरण गायकवाड, सचिन जाधव, नितीन होळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.उद्घाटनपर प्रदर्शनी सामन्यात ग्रामीण गटातला पहिला सामना पारस खेड विरुद्ध बलसुर यांच्यामध्ये झाला. या सामन्यात बलसुर संघाने 13 गुणांनी विजयी संपादन केले .या सामन्यात सरपंच म्हणून मुनीर शेख पंच म्हणून गोविंद जाधव व पंच म्हणून मालोजी काळे सहाय्यक गुणलेखक म्हणून सुरेंद्र वाले संतोष राठोड गुणलेखक म्हणून आनंदराज बिराजदार थर्ड रेड राजेंद्र सगर सर इत्यादींनी काम पाहिले तर दुसरा प्रदर्शनी सामना श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा विरुद्ध डाळिंब या संघादरम्यान सामना झाला.या सामन्यात शिवाजी महाविद्यालयाचा संघ 21 गुणांनी विजयी झाला. सदर सामन्यात सरपंच म्हणून मालाजी काळे पंच म्हणून मुनीर शेख गोविंद जाधव गुणलेखक म्हणून आनंदराज बिराजदार सहाय्यक गुणलेखक म्हणून सुरेंद्र वाले संतोष राठोड थर्ड रेड साठी राजेंद्र सगर यांनी काम पाहिले.या राज्यस्तरीय स्पर्धेचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर संजय अस्वले यांनी केले. राज्यभरातून एकूण 42 संघ या स्पर्धेसाठी कबड्डीचे सादरीकरण करणार आहे.या कार्यक्रमासाठी अश्लेष भैया मोरे मित्र मंडळाचे अध्यक्ष विशाल कानेकर, अशोक ममाळे ,नितीन कोराळे, अरविंद पाटील, संतोष चौधरी, जयवंत मोरे, नितीन राठोड, व्यंकट पवार,अमोल बंडे, अमित रेड्डी, अर्जुन बिराजदार आदींनी पुढाकार घेतला आहे.यासाठी तालुक्यातील क्रिडा शिक्षक प्रा. विजय पवार, डॉ, राजू सूर्यवंशी, प्रा जी बी गायकवाड, राजेंद्र सोलंकर, संजय कोथळीकर, मुनीर शेख, गोविंद जाधव, सुरेंद्र वाले, राजेंद्र सगर, विश्वजीत दुबे, आनंदराज बिराजदार, संतोष राठोड, राजेंद्र पाटील, बाबुराव पवार, विश्वजीत दुबे, विक्रांत मोरे, हिरालाल गायकवाड, नारायण सोलनकर, ज्ञानेश्वर बिराजदार, अनिल मदनसुरे, डॉ ए सी पाटील, कबड्डीचे व्यवस्थापन पाहत आहेत.