लोहारा :- रौप्य महोत्सवी महाशिवरात्री यात्रा महोत्सव 2025 निमित्त लोहारा शहरातील सप्तरंग मंगल कार्यालयात यात्रा कमिटी व 8×8 चेस अकॅडमी यांच्यावतीने दि.2 मार्च रोजी राज्यस्तरीय भव्य बुद्धीबळ स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये 170 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये खुल्या गटात सातारा येथील खेळाडू ओंकार कडाव यांनी प्रथम पारितोषिक जिंकले तर बारा वर्षाखालील गटात सोलापूरची कुमारी सृष्टी मुसळे हिने प्रथम क्रमांक पटकावला. यामध्ये 12 आंतरराष्ट्रीय नामांकन प्राप्त खेळाडू होते. एवढी मोठी राज्यस्तरीय स्पर्धा प्रथमच महाशिवरात्री यात्रेनिमित्त लोहारा येथे भरवण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये खूपच चुरशीची सावली पाहायला मिळाली. स्पर्धेचे विशेष गोष्ट पाहण्यासारखी जेष्ठ खेळाडू तोडकरी जयकुमार यांनी सात पैकी पाच गुण मिळवत उत्कृष्ट खेळाडू चा बहुमान पटकावला यांचे वय 88 वर्ष आहे, तसेच सर्वात लहान खेळाडू कु.शौर्य मक्तेदार वय वर्ष सात याने सात पैकी चार गुण मिळत उत्कृष्ट खेळाडू चा बहुमान पटकावला. लोहारा शहरातील उत्कृष्ट खेळाडू चा बहुमान विठ्ठल बादूले यांनी पटकावला, द्वितीय क्रमांक श्रीनिवास फुलसुंदर यांनी मिळवला. यावेळी महाशिवरात्री यात्रा कमिटीच्यावतीने बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी म्हणुन गोपाळ सुतार, शैलेश जट्टे, भागवत बनकर, बालाजी मक्तेदार, प्रभाकर बिराजदार, अदि उपस्थित होते.खुला गट,1. कडाव ओंकार 1849 [सातारा],2. बजाज संदेश (लातूर),3. बसर्गीकर चंद्रशेखर 1588(सोलापूर),12 वर्षा खलील गट,1. मुसळे सृष्टी ,2. घंटे वैष्णवी ,3. रेड्डी अपूर्व ,या स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून सीनियर नॅशनल अरबीटर आणि फिडे प्रशिक्षक शशिकांत मक्तेदार यांनी केले. या स्पर्धे साठी सर्व चषक अष्टविनायक क्लासेस कडून देण्यात आले व खुल्या गटातील रोख बक्षिसे यात्रा कमिटी आणि बालाजी मक्तेदार गुरुजी यांच्या कडून देण्यात आले. आणि 12 वर्षाखालील सर्व रोख बक्षिसे सुहास जेवळीकर यांच्या वतीने देण्यात आली. बुद्धिबळ स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बुद्धिबळ स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अमित बोराळे, सुहास जेवलीकर, इर्शाद शेख, संतोष गिरी, नयन मक्तेदार, वीरेश स्वामी, सतीश ढगे, मोहम्मदी हिप्परगे, गोपाळ सुतार, महेश कुंभार, अजित विभुते, समाधान गोरे, रसूल शेख, अदिंनी परिश्रम घेतले.