लोहारा येथे मावेजा व झाडांचे मुल्यांकन करावे या मागणीसाठी पवनचक्की विरोधात शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू 

0
147

 

 

लोहारा :-  तालुक्यातील वडगाव वाडी, हिप्परगा (रवा), उंडरगाव, यास आदी गावातील शेतकऱ्यांना सिमेन्स गमेशा, टोरंट सोलरजेन, या कंपनीच्या वतीने व्यवस्थित मावेजा न दिल्यामुळे या हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी पवनचक्की कंपनीच्या विरुद्ध प्रशासनाकडे तक्रार दाखल करुन दि.4 मार्च पासुन लोहारा तहसील कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसले आहेत. या बाबत माहिती अशी की, सन 2019 मध्ये टोरंट सोलरजेन लि.व सिमेन्स गमेशा, या पवन चक्की कंपनीच्या वतीने लोहारा तालुक्यात अनेक गावांत पवनचक्की उभा केल्या आहेत. या पवन चक्कीच्या माध्यमातून तयार होणारी विद्युत (विज) वाहून नेण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात पोल रोवले आहेत. मात्र शेतकऱ्यांना पोलचा व त्याखाली आलेल्या फळझाडाचा योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना दिला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी अनेक दिवसापासून तक्रार अर्ज, निवेदन देऊन आंदोलन, उपोषण केले होते. दरम्यान याबाबत पवनचक्की कंपनी व शेतकऱ्यांची 2024 मध्ये पोलीस स्टेशन लोहारा येथे बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी पवनचक्की कंपनीच्या प्रतिनिधींनी झाडाचे मूल्यांकन करून घेऊन शेतकऱ्यांना मावेजा देऊ असे सांगितले होते. त्यानंतर याबाबत उपविभागीय दंडाधिकारी अधिकारी उमरगा यांच्या आदेशानुसार सन 2023 मध्ये सदरच्या झाडाचा पंचनामा तहसील कार्यालय लोहारा यांनी केला होता. परंतु आजतागायत शेतकऱ्यांचे झाडांचे मूल्यांकन झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. या उपोषणात सामाजिक कार्यकर्ते तानाजी पाटील, शिवाजी लकडे, संजय सोमवंशी, युवराज तोडकरी, दिलीप लकडे, यांच्यासह आदींचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here