लोहारा :- येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलची शैक्षणिक सहल अकलूज येथे दि.4 मार्च 2025 रोजी संपन्न झाली. यामध्ये अकलूज येथील चिमुकल्यांनी त्यांचे आवडते सयाजीराव वॉटर पार्कचा मनमुराद आनंद लुटला. त्यानंतर शिवसृष्टी पाहताना छ. शिवरायांचा जन्मापासून, शिवनेरी किल्ल्यावर आनंदोत्सव, रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ, तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले, दादोजी कोंडदेव यांच्याकडून शस्त्रविद्येचे धडे घेताना, आग्र्याहून सुटका, अफजलखानाचा वध, रांझ्यांच्या पाटलांचे हात कलम केले. शाहिस्तेखानाची बोटे कापून केलेली फजिती, सुरतेची लूट, दक्षिण दिग्विजय, राज्याभिषेक, छत्रपती बनून रयतेचे स्वराज्य स्थापन केले त्याचबरोबर बाजीप्रभू देशपांडे यांची घोडखिंडीतील लढाई, नरवीर तानाजी मालुसरे यांची स्वतःच्या कुटुंबापेक्षा स्वराज्याविषयी असलेली तळमळ, हंबीरराव मोहिते, जीवा महाला, शिवा काशीद, गुप्तहेर अशा मावळ्यांनी स्वराज्यासाठी देलेली साथ, हौतात्म्य अशा विविध ऐतिहासीक देखाव्यातून छ.शिवाजी महाराज यांनी रयतेचे स्वराज्य निर्माण करून तेथील संग्रहालयातील त्यांनी बांधलेले व जिंकलेले किल्ले रायगड, राजदुर्ग शिवनेरी, प्रतापगड, सिंहगड, सिंधुदुर्ग, विशालगड, देवगिरी, कोंढाणा, पन्हाळगड, जलदुर्ग मुरुड जंजिरा यांची माहिती घेतली. त्यानतंर अतिशय नयनरम्य व संगीतमय शिवछत्रपती मल्टिमीडिया म्युझिकल लेझर शो पाहण्याचा आनंद घेतला. हि शैक्षणिक सहल यशस्वी करण्यासाठी प्राचार्य श्री शहाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धेश्वर सुरवसे, सविता जाधव, हेमा पाटील, सरिता पवार यांनी परिश्रम घेतले, या शैक्षणिक सहलीमध्ये स्कुलमधील इयत्ता पहिली ते आठवीतील एकूण 60 विद्यार्थी सहभागी झाले होते.