लोहारा:- तालुक्यातील मार्डी येथील युवा नेते तथा ग्रामपंचायत सदस्य योगेश देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उपनेते माजी आ.ज्ञानराज चौगुले यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक अविनाश माळी, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, पं.स. माजी सदस्य इंद्रजित लोमटे, ग्रामपंचायत सदस्य नारायण माळी, वि. का.से.सोसायटी चेअरमन बालाजी बाबळे, सहदेव गोरे, रवि कोकरे, अदि उपस्थित होते.