लोहारा :- तालुक्यातील मार्डी येथील युवा नेते तथा ग्रामपंचायत सदस्य योगेश देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराच्या वतीने शहरात दि.5 मार्च 2025 रोजी योगेश देवकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक अविनाश माळी, राजेंद्र माळी, माजी गटनेते अभिमान खराडे, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, पं.स.माजी सदस्य इंद्रजित लोमटे, भाजपा तालुका उपाध्यक्ष संपत देवकर, वि.का. से.सोसायटी चेअरमन बालाजी बाभळे, ग्रामपंचायत सदस्य नारायण क्षीरसागर, हनुमंत रवळे, प्राचार्य शाहाजी जाधव, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, सौदागर गोरे, ज्ञानेश्वर काडगावे, सचिन करे, अदि उपस्थित होते.