उमरगा :- कोरेगाववाडी येथील शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी येथे डीआरएक्स कट्टा मध्ये नंदुरबार येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशीत कांबळे यांची मुलाखत दि.05 मार्च रोजी घेण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष बी.एच. बेडदुर्गे, सचिव डॉ.विजय बेडदुर्गे, उपाध्यक्ष प्रा.अजय बेडदुर्गे यांची उपस्थिती होती. प्रा.अंकिता वडजे यांनी मुलाखत घेतली.
यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशीत कांबळे कांबळे यांनी दिलखुलास उत्तरे दिली. त्यांचे ग्रामीण भागातील बालपण, शालेय, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षण याबद्दल त्यांनी माहिती दिली. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. अपयशाला न घाबरता सतत प्रयत्नशील असावे. चांगल्या सवयी असणारे मित्र निवडावेत. व्यक्तिमत्व विकासावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा व शिक्षकांनी त्यासाठी प्रयत्नशील असावे. जीवनामध्ये पैसे कमावण्याबरोबर ते गुंतविणे व बचत करणे महत्वाचे आहेत. ग्रामीण भागातील युवकांनी आपले ध्येय ठरवावे. आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि सातत्य असेल तर यश नक्कीच मिळतं असं यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य महेश कदारे, डॉ.अश्विनी सुर्यवंशी, प्रा.परीक्षित शिरूरे, प्रा.किरण पांचाळ, प्रा.फुलचंद काजळे, प्रा. श्रीकृष्ण मुळे, प्रा.धनश्री भुजंगे, प्रा.अंकिता यादव, प्रा.शितल शेळके, प्रा.संतोष जाखोटीया, प्रा.अशोक गायकवाड, प्रा.प्राजक्ता ननावरे, प्रा.मंजुषा गव्हाळे, प्रा.ओमकार पाटील व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.