अश्लेष (भैय्या) मोरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

0
211

अश्लेष (भैय्या) मोरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

उमरगा :- भारत शिक्षण संस्था,उमरगा चे उपाध्यक्ष तथा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्लेष (भैय्या)मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त उमरगा शहर व उमरगा- लोहारा तालुका तसेच धाराशिव जिल्ह्यात अनेक सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. उमरगा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमधील २५ अनाथ विद्यार्थ्यांचे पालकत्व अश्लेष मोरे यांनी गेल्या सहा वर्षांपासून स्वीकारले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी अश्लेष मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करण्याची जबाबदारी घेऊन विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण केला.

गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी अश्लेष मोरे कार्य करत आहेत.तसेच एकुरगावाडी येथील अनाथ मतिमंद मुलाना अन्नदान करुन,शालेय साहित्य वाटप करण्यात आले  .  शाळेतील विद्यार्थ्यांना अश्लेष भैय्या मोरे मित्र मंडळाचे अध्यक्ष विशाल काणेकर, भारत शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. सुभाष वाघमोडे, छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले उमरगा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अर्जुन बिराजदार, क्रीडा शिक्षक व शाळेचे माजी विद्यार्थी संजय कोथळीकर, शालेय व्यवस्थापन समितीच्या सुजाता मोरे यांच्या उपस्थितीत शालेय साहित्याचे वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी केले. सूत्रसंचलन सांस्कृतिक विभागप्रमुख सरिता उपासे तर आभार शिल्पा चंदनशिवे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनराज तेलंग, संजय रुपाजी, सदानंद कुंभार, सोनाली मुसळे, वर्षाराणी पाटील, वनमाला वाले, सुनीता राठोड यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here