कास्ती बु शाळेची बाल आनंद मेळाव्यात 45000 रूपयाची उलाढाल

0
29

कास्ती बु शाळेची बाल आनंद मेळाव्यात 45000 रूपयाची उलाढाल

लोहारा :-  तालुक्यातील कास्ती बु येथील जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळेत कौशल्य विकास बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोपाळ समदाळे व सामाजिक कार्यकर्ते परवेज तांबोळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापुन करण्यात आले. या मेळाव्यात विविध खाद्य पदार्थाचे एकूण साठ दुकाने मुलांनी उभी केली होती. या मेळाव्यातून मुलांनी उद्योगी बनावे. मुलांना पैसे कामावताना किती कष्ट करावे लागतात याची जाणीव व्हावी, व्यवहारिक ज्ञान वाढावे या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थित गिरीश जगताप यांच्या कडून मुलांना प्रत्येकी 20 रु पारितोषिक देण्यात आले. या मेळाव्यात तब्बल 45000 हजाराची उलाढाल होऊन मुलांनी 20000 हजार रुपयांचा नफा मिळवला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच अखिल तांबोळी, शाळा व्यवस्थापन उपाध्यक्ष महेश भरगंडे, शाहूराज पाटील, बळीराम साबळे, आनंद पाटील, अमोल कुंभार, जिवन अंबेकर, महादेव साबळे, सुधीर पाटील, विशाल रवळे, अमिन मुलानी, रामेश्वर जगदाळे, कल्याण चव्हाण, गोविंद हजारे, कबीर परसे,संतोष चव्हाण, उपस्थित होते. गावातील महिला पालक सर्व शिक्षण प्रेमी नागरिक बहुसंख्येने उपस्थित राहून विविध रुचकर पदार्थांचा आस्वाद घेतला. कार्यक्रमानंतर स्टॉल लावलेल्या मुलांनी अनुभव कथन करून नफा तोटा, मुद्दल, भांडवल, उलाढाल यावर मत व्यक्त करीत उद्याच्या स्पर्धेच्या युगात माणूस म्हणून जगताना नौकरी नसेल तरी व्यवसायातून जीवन जगता येईल असे मत व्यक्त विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. गावातील महिला, नागरीकांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन वाघमारे यांनी केले तर आभार प्रविण अगंबरे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एकनाथ कदम,बालाजी सोमवंशी, शिवाजी पोतदार, केशर वाघमारे, नितीन कदम, मंदोदरी कोळी यांनी परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here