राजेगाव येथे तालुका विधी सेवा समिती लोहारा व हॅलो मेडिकल फाऊंडेशन अणदूर यांच्या वतीने  कायदे विषयक जनजागृती शिबिर 

0
146

राजेगाव येथे तालुका विधी सेवा समिती लोहारा व हॅलो मेडिकल फाऊंडेशन अणदूर यांच्या वतीने  कायदे विषयक जनजागृती शिबिर

लोहारा:-  तालुक्यातील राजेगाव येथे तालुका विधी सेवा समिती लोहारा व हॅलो मेडिकल फाऊंडेशन अणदूर यांच्या सायुक्त विद्यमाने ,, *बेटी बचाव बेटी पढाव,, महिला दिनाचे औचित्य साधून कायदे* *विषयक जनजागृती शिबिर घेण्यात आले. प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून ,, स्त्री पुरुष समान पाहिजे या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ॲड रविकांत भोंडवे यांनी कायदे विषयक माहिती, मुलीचे शिक्षण या बाबत सविस्तर माहिती दिली. हॅलो च्या वतीने सतीश कदम यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगून, शिक्षणाचे महत्व, आरोग्य, व्यवसाय, ताणतणाव, महिलांना समान हक्क, समान* *कामाचा मोबदला, खेळाचे महत्त्व, आदी विषयावर सविस्तर माहिती दिली. यावेळी विधी सेवा समिती चे ॲड.रविकांत भोंडवे, विधी सेवा समितीचे पाशा शेख, हॅलो मेडिकल फाऊंडेशन अणदूर चे सहा.समन्वयक सतीश कदम, पर्यवेक्षक ज्ञानेश्वर जाधव, स्वाती पाटील, ग्रामसेवक मोरे, सरपंच सुरेश देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष धनराज पाटील, शरद पवार विद्यालयांचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर देशमुख, प्रेरक बालाजी चव्हाण, नितीन मोरे, लहू पापडे, प्रेरीका रंजना कांबळे, नफिसा शेख, यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला पुरुष, युवक, युवती मोठ्या संखेने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वाती पाटील यांनी केले तर प्रेरक नितीन मोरे यांनी संस्थेच्या वतीने आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here