हिप्परगा (रवा) येथील जि.प.प्रा.शाळेत स्वयंशासन दिन साजरा

0
173

हिप्परगा (रवा) येथील जि.प.प्रा.शाळेत स्वयंशासन दिन साजरा

लोहारा :-  तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील जि.प.प्रा.शाळेत दि.7 मार्च 2025 रोजी स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. इयत्ता सातवीच्या मुला मुलींनी वर्गावर जाऊन अध्यापन केले. शिक्षक झाल्यावर चा अनुभव मुलांनी व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी आजच्या मुख्याध्यापिका कुमारी श्वेता गोरे, प्रतीक्षा जाधव, सिद्धी मोरे, रागिनी होणाळकर, जाधव वैष्णवी, अपेक्षा कांबळे, कार्तिक लोमटे. आदी विद्यार्थ्यांनी शिक्षक होऊन शिक्षकाचा अनुभव घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती उलन कांबळे, देशमुख पद्मावती, साळुंखे हरिदास, बंगले नागेश, औटे सिद्राम, परीट संभाजी, घोडके सुधीर, यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here