उमरगा :- बालविकास प्राथमिक विद्यामंदिर उमरगा येथे दि.8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता कावळे मॅडम होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख शिला मुदगडे मॅडम, सुवर्णा आळंगे मॅडम, शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा श्रीमती वरवटे कन्या ताई उपस्थित होत्या. अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली. तसेच विद्यार्थ्यांनी महिलांवर आधारित नृत्य सादर केले. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुवर्णा आळंगे मॅडम व केंद्रप्रमुख शिला मुदगडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना महिला दिनाचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका श्रीमती श्रद्धा पुजारी यांनी केले तर आभार शिक्षक आकाश कटकधोंड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी परिश्रम घेतले. यावेळी पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.