बेलकुंड – चिंचोली सोन एमआयडीसी आली अस्तित्वात, 248 हेक्टर क्षेत्राला औद्योगिक क्षेत्र घोषित करणारी अधिसूचना झाली निर्गमित — आ.अभिमन्यु पवार

0
78

लोहारा :- औशाचे आ.अभिमन्यु पवार यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे राज्याच्या उद्योग विभागाने महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात, महामहिम राज्यपाल यांच्या आदेशाने अधिसूचना प्रसारित करून बेलकुंड व चिंचोली सोन येथील 248 हेक्टर क्षेत्राला औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या अधिसूचनेसह बेलकुंड – चिंचोली सोन एमआयडीसी अस्तित्वात आली आहे. राज्याचे कार्यतत्पर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उद्योग मंत्री उदयजी सामंत व पालकमंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आ.अभिमन्यु पवार यांनी औसेकरांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले आहे. आता लवकरच भूसंपादनाला सुरुवात होईल, त्यानंतर निधी उपलब्ध करून घेऊन आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी करण्याचे आणि एखादा मोठा निर्मिती उद्योग बेलकुंड – चिंचोली सोन एमआयडीसीत आणून हजारो तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्याचे नियोजन एअआहे. यासोबतच औसा तालुक्यातील तरुण उद्योजकांना या एमआयडीसीमुळे उद्योगांसाठी जागा सुद्धा उपलब्ध होणार आहे. बेलकुंड – चिंचोली सोन एमआयडीसीच्या माध्यमातून औसा मतदारसंघाचे अर्थकारण पूर्णतः बदलणार आहे, असे आ. अभिमन्यु पवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here