लोहारा :- ग्रामपंचायत कार्यालय दाळिंब येथे दि.8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिला सन्मान सोहळा सपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष रंजना सातपुते होत्या तर प्रमुख अतीथी म्हणून डाँ.यळापुरे मॅडम, दाळिंब गावाचे पोलीस पाटील अश्विनी वाले, भाग्यश्री जाधव आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवराच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँ साहेब व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, अहिल्याबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रस्ताविक करताना समाजसेवक बाबा जाफरी यांनी म्हणाले कि, ‘ईश्वराची जगातील सर्वात सुंदर निर्मिती आणि सहनशक्तीचा स्रोत म्हणजे स्त्री आहे,’ असे सांगितले. यावेळी मान्वरांच्या हस्ते ॲड.फरहीन खान पटेल यांचा कर्तुत्ववान महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.यावेळी ॲड.फरहीन खान पटेल यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना जागतिक महिला दिन साजरा करण्यामागची पार्श्वभूमी सविस्तरपणे सांगितले. व महिलांची सुरक्षितता जबाबदाऱ्यांवर प्रकाश टाकला ‘पुरुषांची बरोबरी कौशल्याने सिद्ध करावी, सावित्रीची लेक जेव्हा शिक्षणाचा हात धरी .’ही त्यांची स्वरचित कविता सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमास गंगाबाई टिकंबरे, दौलतबी शानेदिवाण, महिला शेतकरी अपरूब मियासे, गावडे ताई, ब्याले ताई, गावातील सर्वच शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षिका, अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा कार्यकर्त्या, बचतगट महिला, गावातील महिला व पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावचे सरपंच परशुराम देवकाते, बालाजी सातपुते, असिफ शिलार, ग्रामसेवक कदम, अदिंनी परगश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बसवराज सारणे यांनी केले.


