राजरथ चॅरिटेबल ट्रस्ट संचालित जनरल हॉस्पिटल लातूर व सोमेश्वर मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन
लोहारा :- राजरथ चॅरिटेबल ट्रस्ट संचालित सर्व जनरल हॉस्पिटल पद्मानगर बार्शी रोड लातुर व सोमेश्वर मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वसामान्य शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन लोहारा शहरातील सोमेश्वर मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल येथे दि.16 मार्च 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात आतड्यांचे सर्व आजार, अपेंडिस (ओपन दुर्बीनद्वारे), हर्निया (ओपन दुर्बीनद्वारे), हार्डोसिल, सुनता, मुळव्याध, भगंदर, वेरीकोज वेन, हाता–पायावरील सुज जंतुसंसर्ग, त्वचारोपन, सर्व प्रकारच्या गाठी, कर्क रोग, मुत्ररोग, मुतखडे, मज्जातंतु सबंधित रोग त्यावरील उपचार, प्लास्टिक सर्जरी (सौंन्दर्य सबंधीत शस्त्रक्रिया ), हाडासबंधीत उपचार, दुर्बिणीद्वारे अत्याधुनिक शस्त्रक्रिया अत्यत्प दरात करण्यात येणार आहेत. तरी या शिबीराचा परिसरातील महिलांनी व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहान डॉ.आम्लेश्वर गारठे (लोहारा) व डॉ. राघवेंद्र देशमुख (लातूर) यांनी केले आहे.