भाजपा लोहारा तालुक्याची संघटनात्मक ‘संघटन पर्व’ बैठक संपन्न

0
99

 

लोहारा :- भारतीय जनता पार्टी लोहारा तालुक्याची संघटनात्मक सदस्यता नोंदणी बैठक जिल्हा निवडणूक अधिकारी गुरुनाथजी मगे यांच्या अध्यक्षतेखाली व भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, उमरगा, लोहारा विधानसभा निवडणूक प्रमुख राहुल पाटील, तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोहारा शहरातील सुतार कॉम्प्लेक्स येथे दि.13 मार्च रोजी संपन्न झाली. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी गुरुनाथजी मगे, भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, विधानसभा निवडणूक प्रमुख राहुल पाटील यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. विधानसभा निवडणूक प्रमुख राहुल पाटील व तालुका सरचिटणीस दगडु तिगाडे यांनी लोहारा तालुक्यात भाजपाची 1000 सदस्य नोंदणी केल्याबद्धल यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष नेताजी शिंदे, विस्तारक शिद्धेश्र्वर माने, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका सरचिटणीस दगडु तिगाडे, शुभम साठे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बालाजी चव्हाण, तालुका उपाध्यक्ष संपत देवकर, तालुका उपाध्यक्ष दिलिप पवार, तालुका उपाध्यक्ष बालासिंग बायस, तालुका उपाध्यक्ष दत्ता कडबाने, तालुका उपाध्यक्ष बसवराज कोंडे, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष सौरभ कागे,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विरेंद्र पवार, युवा मोर्चा शहराध्यक्ष बाबा सुंबेकर, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, तालुका चिटणीस युवराज जाधव, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस सुयश दंडगुले, प्रशिद्धीप्रमुख निकेश बचाटे, ओबीसी तालुकाध्यक्ष बालाजी सोनटक्के, मोहन जेवळीकर, संजय कदम, परमेस्वर कदम, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस मुरलीधर होनाळकर, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष मल्लीनाथ फावडे, राम साठे, सचिन हत्ते, गणेश रवळे, संतोष मुर्टे, गोवर्धन मुसांडे, गोविंद यादव, बालाजी कदम, ‌बालाजी घोडके, शंभु सुतार, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकिचे सुत्रसंचालन विस्तारक शिद्धेश्र्वर माने यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे यांनी मानले.

 

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here