निरंजन संजय झिंगाडे यांचे स्पर्धा परीक्षेत यश; शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले यांच्यावतीने सत्कार

0
211

 

उमरगा :-  तालुक्यातील गुंजोटी येथील चि.निरंजन संजय झिंगाडे यांची स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भारत सरकारच्या वस्तु व सेवा कर निरीक्षक (GST inspector) या पदावर निवड झाली आहे. या यशाबद्दल उमरगा शहरातील शिवसेना संपर्क कार्यालयात दि.13 मार्च रोजी शिवसेना उप नेते तथा माजी आ. ज्ञानराज चौगुले यांनी निरंजन झिंगाडे यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, राहुल शिंदे, नरेंद्र इंगळे, संदीप चौगुले, बाबा सोनकवडे, पंकज माळी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here