लोहारा :- भानुदासराव चव्हाण महाविद्यालय लोहारा आणि देशपांडे स्किलिंग, हुबळी कर्नाटक यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात करिअर प्रशिक्षण स्किल डेव्हलपमेंट संबंधी एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्य शाळेसाठी महाविद्यालयातील व परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये देशपांडे स्पेलिंग चे श्री. अजित कुलकर्णी व शिवकुमार गुत्तेदार यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रा बरोबरच संपूर्ण भारतातील विविध क्षेत्रातील बेकारी व बेकारींचे कारणे समजावून सांगितली. नोकरी मिळवत असताना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्याकडे कोणती कौशल्ये असणे आवश्यक आहे या संदर्भात मौलिक मार्गदर्शन केले. यासाठीचे उत्तम स्किल प्राप्त करण्यासाठी देशपांडे स्किलिंग, हुबळी येथे प्रवेश घेण्याचे आवाहनही यावेळी श्री. अजित कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास ढोकळे हे होते. या कार्यशाळेसाठी आवर्जून उपस्थित राहिलेले दैनिक सकाळचे पत्रकार श्री. निळकंठ कांबळे यांनी देशपांडे स्किलिंगच्या कार्यपद्धतीचा अनुभव सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महाविद्यालयाचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर डॉ. व्यंकट चिकटे यांनी केले. यावेळी प्रा. स्वाती निकम, डॉ. प्रशांत माने, डॉ. महानंदा मोरे, डॉ. संगीता सरवदे, प्रा. राजेंद्र पात्रे, प्रा. विनोद तुंगे, प्रा. व्यंकटेश घोडके, प्रा. रुपाली कोटणूर, प्रा. प्रतिक्षा कदम इ. प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.