लोहारा तालुका जुक्टाचे लक्षवेधी आंदोलन

0
9

लोहारा :- राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या विविध रास्त मागण्या अनेक दिवसापासून प्रलंबित असून शासन आणि प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे. या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.१७ मार्च २०२५ रोजी संपूर्ण राज्यात तहसिलदार ते शिक्षणमंत्री यांना जुक्टा महासंघाच्या निर्णयानुसार निवेदन देवून शासनाला कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा यासाठी आंदोलन छेडले जात आहे. महासंघाच्या निर्णयास प्रतिसाद देत लोहारा तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांनी तहसिलदार, लोहारा यांना विविध मागण्यांचे निवेदन देवून आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार रणजितसिंह कोळेकर यांच्या वतीने प्रभारी नायब तहसीलदार अशोक शिंदे यांच्याकडे लोहारा तालुका जुकटा अध्यक्ष प्रा.प्रशांत काळे, प्रा शंकर शिंदे यांनी विविध शैक्षणिक मागण्याचे निवेदन सादर केले. याप्रसंगी प्रा सुनिल बहिरे, प्रा.विठ्ठल कुन्हाळे, प्रा.राजेंद्र साळुंके, प्रा.ज्ञानदेव शिंदे, प्रा.राजेशा आष्टेकर, प्रा.मुकुंद रसाळ, प्रा. विद्यासागर गिरी, प्रा.रामचंद्र खुणे, प्रासचिन शिंदे, प्रा.नारायण आनंदगावकर, प्रा.विजय उंबरे, प्रा. गणेश कांबळे, प्रा.विष्णुदास कलमे यांच्यसह तालुक्यातील सर्वच कनिष्ठ महाविदयालयाचे प्राध्यापक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here