लोहारा :- शहरातील शंकरराव जावळे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय लोहारा येथील डॉ.मनोज सोमवंशी यांची महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र व उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने चालणाऱ्या करीअर कट्टा तालुका समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली. करीअर कट्टा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्याना मोबाईल ॲपच्या माध्यमातून तज्ञ व्यक्तीचे स्पर्धापरीक्षा व उद्योगधंदे यांच्या विषयी दररोज माहिती दिली जाते. तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून नोकरी विषयक जाहिराती, चाचण्या, पोलीस भरती व इतर राज्यसेवा परीक्षा संदर्भातील यू ट्यूब वरील मार्गदर्शन तसेच यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन लाभते. तसेच याच्या माध्यमातून महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.या निवडीबद्दल करीअर कट्टा महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष यशवंत शितोळे, संस्थेचे अध्यक्ष रमेश पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेषेराव जावळे पाटील, डॉ. संजय अस्वले, डॉ.हरिदास फेरे (धाराशिव जिल्हा प्राचार्य प्रवर्तक) डॉ. दत्तात्रय साखरे, डॉ. मंगेश खराटे ( जिल्हा समन्वयक), मनोज पाटील, डॉ. विनायक पाटील, डॉ. रामहरी सूर्यवंशी डॉ.शिवाजी कदम, डॉ. बालाजी राजोळे, डॉ.रामेश्वर धप्पाधुळे, डॉ.छाया कडेकर, डॉ.पार्वती माने, डॉ. सूर्यकांत बिराजदार, प्रा.दत्ता कोटरंगे, डॉ.सुदर्शन सोनवणे, डॉ.प्रभाकर गायकवाड, डॉ. विनोद आचार्य, डॉ. भैरवनाथ मोटे, डॉ. संदीप कोरेकर, प्रा. प्रियंका गिरी, डॉ. शिरीष देशमुख, बालाजी सगर, नंदकिशोर माने, प्रवीण पाटील, परमेश्वर कदम, प्रकाश राठोड यांनी अभिनंदन केले आहे.