मुर्शदपुर येथील महीलांनी महीला स्नेह मेळाव्यात संगीत खुर्चीचा आनंद लुटला 

0
85

लोहारा  :- तालुक्यातील मुर्शदपुर येथील महीलांनी महीला स्नेह मेळाव्यात संगीत खुर्चीचा आनंद लुटला. गावात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महीलांनी एकत्र येऊन स्वखर्चाने या महीला मेळाव्याचे आयोजन केले होते. लोहारा तालुक्यातील मुर्शदपचर येथील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या एकत्र आल्या. व महीलांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आपापसात वर्गणी जमा करून गावातील स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमासाठी जिजाऊ ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्षा सत्यवती इंगळे, करदोरा (ता. उमरगा) येथील सरपंच सुनंदा रणखांब, होळीच्या सरपंच संयोजा बिराजदार, मुर्शदपुरच्या उपसरपंच संगीता माने, अंगणवाडी पर्यवेक्षिका संगीता क्षीरसागर सामाजिक कार्यकर्त्या नागिनी सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिजाऊ ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्षा सत्यवती इंगळे वसामाजिक कार्यकर्त्या नागिनी सुरवसे यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्त्रीयांना आत्मसन्मान जागा केला. विविध सामाजिक प्रश्न, जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित घटनांचे दाखले देत आदर्श समाज निर्मितीसाठी स्त्रियांचे योगदान या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थीत महीलांचा सत्कार, सन्मान करण्यात आला.दरम्यान उपस्थित महीलांची संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. यात वैष्णवी बलसुरे यांनी प्रथम,स्वाती पाटील यांनी द्वितीय तर प्रतीक्षा मोरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्याबद्दल त्यांना पारितोषिक देवून गौरविण्यात आले. शिव आरती, राजमाता जिजाबाई,माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांच्या पुजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी मुर्शदपुर येथील महीला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नितीन मोरे यांनी केले. तर मुर्शदपुरच्या पोलीस पाटील तथा महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या महीला आघाडी तालुका अध्यक्षा मनिषा चाकुरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here