इस्लाम धर्माचे मुख्य सिद्धांत पाच आहेत त्यास अरकान – ए – इस्लाम किंवा अरकान – ए – दीन असे म्हणतात.या मुख्य सिद्धांताचे पालन करने मुस्लिम व्यक्तिवर अनिवार्य (फर्ज) आहे.
१ आस्था ची घोषणा (शाहादा,शहादत,कलमा) :-ला इलाहा इलल्लाहु मुहम्दुरंसुलुल्लहि.ईश्वर (अल्लाह) हाच एकमात्र ईश्वर ( अल्लाह) आहे आणि हजरत मुहम्मद सलल्लाहो अलेहि वसल्लम हे ईश्वर (अल्लाह) चे ( दुत ) पैगंबर आहेत आणि हे शेवटच दुत (रसूल पैगंबर) आहेत.
इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी कलमा म्हटले पाहिजे.
२ प्रार्थना (नमाज) :- नमाज चा अर्थ आहे ईश्वर (अल्लाह ) वंदना या प्रार्थना करने मुस्लिम समाजातील व्यक्तींना दिवसभरातून पाच वेळेस प्रार्थना (नमाज) पडणे अनिर्वाय (फर्ज) आहे.
३ दान (जकात) :-मुस्लिम समाजातील व्यक्तींना आपल्या संपत्तीच्या ठराविक रकमेतून रक्कम म्हणजेच ज्या व्यक्ती जवळ 100 रुपये असतील तर त्यांनी 2:50 गोरगरीब अनाथ लोकांना दान केले पाहिजे..
४ उपवास ( रोजा ) :-इस्लामी पचांग नुसार नववा महिना हा रमजान चा असतो.रमजान महिन्याची मुस्लिम लोक आतुरतेने वाट पाहत असतो.रमजान च चंद्र दिसल्यावर रोजा (उपवास) व तराविह ( पूर्ण कुराण ची पठण) ची नमाज चे पठण केले जाते.मुस्लिम समाजातील व्यक्ती रमजान महिन्यातील पूर्ण 30 दिवस दिवसभर अन्न पाणी विना उपवास रोजा राहवे लागते उपवास च्या दिवशी फ़जर पहाटे च्या प्रार्थना (नमाज) च्या अगोदर जेवण करतात त्याला सहरी म्हणतात आणि दिवसभर काहीच न खाता पीता मगरीब म्हणजेच सूर्यास्त ला उपवास रोजा सोडला जातो त्याला इफ्तार म्हणतात.इफ्तार ला पेड़खजूर,तरबूज खरबूज इतर फ्लाहार आणि अन्नपदार्थ घेऊन सोडला जातो.
रमजान च्या पूर्ण महिन्याला तीन भागा मध्ये विभागले आहे याला आशरा असे म्हणतात.
१ एक ते दहा दिवसांचा एक भाग त्याला रहमत (कृपा,दया,करुणा)यामध्ये अल्लाह ईश्वर आपली रहमत कृपा रोजा ठेवणाऱ्या वर आणि नमाज पठण करण्यावर करत असतो.ह्या या दिवसांमध्ये शक्य होईल तेवढे चांगले कर्म करणे दान देणे गरजवंत आहेत त्यांना मदत करणे गरजेचे आहे.
२ अकरा ते वीस दिवसाचा त्याला बरकत (लाभ,फायदा) रोजा व नमाज जेवढी जास्त अल्लाह ची प्रार्थना करता येईल केले पाहिजे आणि जी काय आपल मागण आहे अल्लाह आपल मागण नक्कीच पूर्ण करतो.
३ एकवीस ते तीस दिवसाल मगफिरत (माफी) चंद्रानुसार कधी 9 ते 10 दिवसाचा हा भाग असतो ह्या दिवसात रोजा नमाज केली की चांगले कर्म केले की अल्लाह त्याला नरक (जहनुम) पासून दुर ठेवतो आणि त्याला (जन्नत ) स्वर्गात पाठवत असतो.
रोजे पूर्ण झाल्यावर चंद्र दिसल्यावर म्हणजेच इस्लामी कॅलेंडर नुसार 10 वा महिना शव्वाल च्या पहिल्या दिवशी ईद साजरी केली जाते तिला ईद – उल – फित्र किंवा ईद – उल – फितर असे म्हणतात.ईदच्या दिवशी सर्व लोक एकत्र येऊन ईदगाह मध्ये जाऊन प्रार्थना नमाज चे पठण करतात आणि त्यात विश्व कल्याणासाठी,सुख शांती साठी प्रगती साठी प्रार्थना करतात सर्व लोक एकमेकांना आलिंगन,एकमेकांच्या हातात हात देऊन ईद च्या शुभेच्छा देतात तसेच हिंदू बांधव पण रमजान ईद च्या शुभेच्छा देण्यासाठी ईदगाहवर हजर असतात तसेच मुस्लिम बांधव आपल्या हिंदू बांधवांना मित्रांना आपल्या घरी शिरखुरमा चा आस्वाद घेण्यासाठी घरी बोलवतात.पूर्ण विश्व मध्ये ईद उत्साहात आनंदात सलोखा शांतता सर्व धर्म समभाव या भावनेतून साजरी केली जाते.
५ तीर्थ यात्रा (हज) :- मुस्लिम समाजातील व्यक्तीं जी शारीरिक आणि आर्थिक सक्षम असेल त्यांनी काबा ( मक्का मदिना ) सर्वात पवित्र शहर सऊदी अरब ची जीवनात एकदा तरी मक्का मदिना ची तीर्थयात्रा हज केले पाहिजे.जी व्यक्ती ही यात्रा पूर्ण करेल त्याच्या नावा अगोदर हाजी हा शब्द लावला जातो.
प्रा इसाक करीम शेख ,नाईचाकुर ,ता. उमरगा,जि.धाराशिव