आष्टा कासार येथील जिप चालकांची 4 अपत्ये उच्च शिक्षित
लोहारा :- अनेकदा कित्येक खेडेगावात मुलींच्या शिक्षणासाठी शहरात पाठवण्यास विरोध. ऐपत असुन ही पालकांच्या मानसिकतेतुन मुलींच्या शिक्षणासाठी नकारार्थी भावना दिसुन येते. मुलींच्या लग्नासाठी पैसा जमा करावे लागते. यात मुलीला शिक्षण देणे तर विसराच.अशात आर्थिक स्थिती कमकुवत. 3 मुली झाल्या यांचे ओझे. लग्नाचा खर्च, त्यात शिक्षण नकोरे बाबा हे झेपायचे नाही. असे नर्व्हस न होता. जिद्दीने 4 लेकराचे शिक्षण पूर्ण करणारा लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथील रहिवासी प्रकाश विश्वनाथ बलसुरे हे व्यवसायाने जीप ड्रायव्हर पण जिद्दीने 3 मुली 1 मुलगा गरिबीवर मात करत उच्च शिक्षण दिले. जीपच्या कमाईवर चौघांनाही इंजिनियर करून नोकरीवर लावले आहेत. यांची ही जिद्द पाहून कोणालाही हेवा वाटावा असे त्यांचे कार्य आहे. घरची परिस्थिती नाजूक असुन या परिस्थितीवर मात करीत आई-वडिलांचे नावलौकिक केले. आपल्या आई – वडिलांची कमाई तुटपूज्य असून सुद्धा कधी शिक्षणातून माघार घेतली नाही. वडील प्रकाश नावा प्रमाणेच वडिलांने आपल्या चारही लेकरांना प्रकाशात आणले. याच जीपच्या कमाईवर आपत्यांना जिद्दीने शिक्षण दिले. मुलींच्या, मुलांच्या जिद्दीमुळे चारही अपत्य उच्च शिक्षित झाले. पण आई – वडील 10 वी नापास असून सुद्धा जिद्दीने मुलांना शिक्षण दिले. आपलं आयुष्य पत्र्याच्या घरी गेलं. पण आई वडील हे इतक्या हालाकीतुन सुद्धा आपल्याला शिक्षण दिलेत, याची जान मुलींनी ठेवून आई – वडिलांना बंगला बांधून देऊनच ऋणातून मुक्त होऊ, मुलींनी आईचे वडिलांचे हे ऋण फेडल्या शिवाय लग्न करून घ्यायचेच नाही असे ठरवून आष्टा कासार येथे सुंदर असा टोलेदार बंगला बांधून बंगल्याच्या चाव्या आई – वडिलांकडे सुपूर्द केल्या. आई-वडिलांचे पांग फेडले. आता राहण्यासाठी घर झाले. आई – वडिलांनां आता तुमच्या म्हणण्यानुसार आमचे लग्न करण्यास सहमती दर्शविली.1 मुलगा पुणे येथे, 3 मुली मुंबई येथे चांगल्या पॅकेजवर इंजिनिअर म्हणून काम करत आहेत. अशा ह्या देहवेड्या कुटुंबाचं आष्टा कासार येथे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. अशा या जिद्दी मुलांचे बालकांचे सेवानिवृत्त शिक्षक बहुउद्देशीय सामाजिक संस्था आष्टा कासार तर्फे हार्दिक हार्दिक कौतुक व अभिनंदन.