शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयास जिल्हास्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय म्हणुन चौथा पुरस्कार प्राप्त
लोहारा :- महाराष्ट्र राज्य माहिती व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र ‘करिअर कट्टा’ अंतर्गत शंकरराव जावळे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लोहारा या महाविद्यालयास (करीअर कट्टा धाराशिव जिल्हास्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय म्हणुन चौथा पुरस्कार तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेषेराव जावळे पाटील यांना करीअर कट्टा उत्कृष्ट प्राचार्य म्हणुन तृतीय पुरस्कार मिळाला आहे. तर डॉ.मनोज सोमवंशी यांना करीअर कट्टा उत्कृष्ट महाविद्यालय समन्वयक द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ देवगिरी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी करिअर कट्टा महाराष्ट्र महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष यशवंत शितोळे, प्राचार्य डॉ.अशोक तेजनकर, प्राचार्य डॉ.संजय अस्वले, प्राचार्य डॉ.संजय खरात, प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.हरिदास विधाते, डॉ.लक्ष्मीनारायण कुरपटवार, अदि मान्यवर उपस्थित होते. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रमेश पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेषेराव जावळे पाटील, डॉ.संजय अस्वले, डॉ. हरिदास फेरे (धाराशिव जिल्हा प्राचार्य प्रवर्तक), डॉ.नितीन पडवळ (करीअर कट्टा, विभागीय सह समन्वयक) डॉ. दत्तात्रय साखरे, डॉ.मंगेश खराटे (जिल्हा समन्वयक), मनोज पाटील, डॉ.विनायक पाटील, डॉ.रामहरी सूर्यवंशी डॉ.शिवाजी कदम, डॉ.बालाजी राजोळे, डॉ.रामेश्वर धप्पाधुळे, डॉ.छाया कडेकर, डॉ.पार्वती माने, डॉ.सूर्यकांत बिराजदार, प्रा.दत्ता कोटरंगे, डॉ.सुदर्शन सोनवणे, डॉ.प्रभाकर गायकवाड, डॉ.विनोद आचार्य, डॉ. भैरवनाथ मोटे, डॉ.संदीप कोरेकर, प्रा. प्रियंका गिरी, डॉ.शिरीष देशमुख, बालाजी सगर, नंदकिशोर माने, प्रवीण पाटील, परमेश्वर कदम, प्रकाश राठोड अभिनंदन केले आहे.