शालेय विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषा विषयी जागरूकता

0
66

 

उमरगा: येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे “जनरल इंग्लिश अवेअरनेस प्रोग्रॅम” अंतर्गत शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाच्या संदर्भात मार्गदर्शन करून इंग्रजी बद्दल वाटणारी भीती व अनास्था दूर करून रुची निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शहरातील श्री श्री रविशंकर विद्या मंदिर प्रशालेतील विद्यार्थ्यांना प्रज्वल तात्याराव चव्हाण व योगेश्वरी खंडू मारकड या बी. ए. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेबाबत मार्गदर्शन केले. या विद्यार्थ्यांना इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. एस. व्ही. बहिरव, डॉ. सी. डी. करे, डॉ. एस. डी. मुंगळे, डॉ. एस. टी. तोडकर व प्रा. सागर बहिरव यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. अस्वले, उपप्राचार्य डॉ. व्ही. एस. इंगळे व डॉ. पी. ए. पिटले आदींनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here