उमरगा :- तालुक्यातील चिंचोली जाहगीर येथे अवकाळी पावसाच्या तडाख्यात वीज पडून एका शेतकऱ्याच्या बैल जोडीतील एका बैलाचा मृत्यू झाल्याची घटना दि.20 रोजी घडली आहे.उमरगा तालूक्यात रात्री विजेच्या गडगडाटासह सर्वत्र पाऊस झाला. यात विज पडून चिंचोली जहागीर येथे एक बैलांच्या मृत्यू झाला आहे. चिंचोली जहागीर येथील शेतकरी तुकाराम माने यांच्या शेतातील एक बैल विज पडून मृत्यू तर एक बैल जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, तालूक्यातील इतर गावात झालेल्या नुकसानीची माहिती प्रशासनाकडून घेतली जात आहे.