मार्डी येथे मुख्यमंत्री शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत महसूल प्रशासन तहसील कार्यालय लोहारा यांच्या वतीने क्षेत्रीय गाव भेट कार्यक्रम संपन्न

0
169

लोहारा   :- तालुक्यातील मार्डी येथे मुख्यमंत्री शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत महसूल प्रशासन तहसील कार्यालय लोहारा यांच्या वतीने दि.21  रोजी क्षेत्रीय गाव भेट कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणुन उपविभागीय अधिकारी उमरगा गणेश पवार, तहसीलदार लोहारा रणजितसिंह कोळेकर, पुरवठा नायब तहसीलदार श्रीमती खडे मॅडम, मार्डी येथील श्रीमंत पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, उपसरपंच शरद कदम, ग्रामपंचायत सदस्य योगेश देवकर, अदि उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी संगायो योजने अंतर्गत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा पात्र अर्जदार यांना लाभ देण्यात आला. यावेळी महसूल प्रशासनातील विविध विषयासंबंधी व विविध योजना संबंधी माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. यावेळी कार्यक्रमाची प्रस्ताविकपर सविस्तर माहिती तहसीलदार रणजितसिंह कोळेकर यांनी सांगितली. यावेळी मंडळ अधिकारी (धानोरी) वाजिद मणियार यांनी शेत रस्त्याबाबतच्या विविध तरतुदी बाबत सविस्तर माहिती दिली. तसेच ॲग्रीस्टॅग या योजनेची माहिती ग्राम महसूल अधिकारी किशोर पवार यांनी दिली. पुरवठा नायब तहसीलदार श्रीमती खडे मॅडम यांनी पुरवठा विभागातील विविध स्वरूपाची माहिती ग्रामस्थांना दिली. सांगयो/ इंगायो विभागातील विविध स्वरूपाच्या योजनांची माहिती पटेल सर यांनी दिली. तसेच निवडणूक विभागामार्फत (बीएलओ) माणिकशेट्टी सर यांनी माहिती दिली. यानंतर उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांनी ग्रामस्थांना विविध प्रकारची माहिती देऊन लोकांच्या अडीअडचणी जाणुन घेऊन चर्चा करून कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अव्वल कारकुन अशोक शिंदे यांनी केले तर आभार दिपक रेड्डी यांनी मानले. या कार्यक्रमास तहसील कार्यालयातील कर्मचारी, मार्डी गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here