कोरेगाववाडी येथील शिवाई शैक्षणिक संकुलात विविध विषयासंदर्भात मार्गदर्शन 

0
130

उमरगा :- तालुक्यातील लातुर- उमरगा रोडवरील कोरेगाववाडी येथील शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शिवाई इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग येथे दि.20 मार्च रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक बहिःशाल उपक्रमांतर्गत महिला सबलीकरण, तणाव व्यवस्थापन, अँटी रॅगिंग प्रतिबंध कायदा, संवाद कौशल्ये याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शिवाई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष बी.एच. बेडदुर्गे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी सचिव डॉ. विजय बेडदुर्गे, उपाध्यक्ष प्रा.अजय बेडदुर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती.  प्राचार्य कदारे यांनी तणावमुक्त जीवन या विषयासंदर्भात मार्गदर्शन केले. डॉ.अश्विनी सुर्यवंशी यांनी स्त्री सशक्तिकरण व सबलिकरण याविषयी मार्गदर्शन केले. अमोल बिराजदार यांनी अँटीरॅगिंग याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच प्रा.परीक्षित शिरूरे यांनी संवाद कौशल्ये विषयावर आपले विचार मांडले. विद्यार्थ्यांना भावी जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर तणावमुक्त जीवन जगले पाहिजे. विद्यार्थ्यांनी व महिलांनी आर्थिक सशक्तिकरण व सबलिकरणावर भर द्यावा. तसेच रॅगिंग विषयी तक्रार निवारण, जनजागृती करण्यात यावी.आधुनिक जीवनात संवाद कौशल्य महत्वाचे असल्याचे यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी महाविद्यालयातील प्रा.प्रशांत वाघमारे, प्रा.शुभम सूर्यवंशी, प्रा.अविनाश चौधरी, प्रा.अभिजीत पाटील, प्रा.शहाबाज शेख, प्रा.औदुंबर जाधवर, प्रा.अविनाश कुंभार, प्रा.शुभांगी बंदीचोडे, प्रा.मोनिका धुरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.निलोफर शेख यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here