लोहारा :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांची आ.अभिमन्यु पवार यांनी भेट घेऊन 100 खाटांच्या औसा उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन, जिल्हा परिषद प्रशाला, बोरफळ येथील राजमाता जिजाऊ – शाळा माझी न्यारी अभियानाअंतर्गत विकसित शिक्षण सुविधांचे लोकार्पण व 33 KVA क्षमतेच्या आशिव विद्युत उपकेंद्राचे भूमिपूजन कार्यक्रमासाठी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वेळ देण्याची विनंती केली. निधी उपलब्धतेअभावी औसा संघातील काही रस्त्यांचे कामे रखडली असून प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्याची विनंतीही त्यांना केली. विविध विकासकामांच्या उदघाटन व लोकार्पणासाठी औसा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आल्यानंतर पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज आशियाई डेव्हलपमेंट बँक निधीअंतर्गत निर्माणाधीन असलेल्या निळकंठेश्वर व महापुरुष मार्गांची तसेच मागच्या महिन्यात लोकार्पण झालेल्या माळुंब्रा विद्युत उपकेंद्राची पाहणी सुद्धा करणार आहेत, अशी माहिती आ. अभिमन्यु पवार यांनी दिली.


