“धाराशिव ग्रंथोत्सव 2024” मध्ये स्थानिक साहित्यिकांच्या ग्रंथांना विशेष संधी

0
56

धाराशिव:-  जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्या वतीने दि. २४ व २५ मार्च २०२५ या कालावधीत “धाराशिव ग्रंथोत्सव २०२४ आयोजित करण्यात आला आहे.या ग्रंथोत्सवात विविध प्रकाशन संस्था व पुस्तक विक्रेत्यांचे स्टॉल्स असणार असून, वाचकांसाठी भव्य ग्रंथप्रदर्शन व पुस्तक खरेदीची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.विशेषतः,धाराशिव जिल्ह्यातील साहित्यिकांसाठी एक स्वतंत्र स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये स्थानिक साहित्यिकांचे प्रकाशित ग्रंथ प्रदर्शित व विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.ज्या साहित्यिकांचे ग्रंथ प्रकाशित झाले आहेत,त्यांनी दि.२३ मार्च २०२५ पर्यंत आपली पुस्तके सुरेश जोशी (संपर्क: 9881449583) आणि समाधान शिकेतोड (संपर्क: 9421098130) यांच्याकडे जमा करावीत.स्थानिक साहित्यिकांना आपल्या साहित्यकृतींना व्यापक वाचकवर्ग मिळावा,या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here