लोहारा :- महिलांना व किशोरी मुलींना भविष्यात एखादे संकट आल्यास त्या परिस्थितीवर रडत बसण्याऐवजी कायद्याचा आधार घेऊन आलेल्या परिस्थितिशी लढायला शिका “रडणारी नाही तर लढणारी बना” असे प्रतिपादन ॲड.फरहीन खान-पटेल यांनी केले. एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प मुरूम तालुका उमरगा अंतर्गत किशोरवयीन मुलींना व महिलांना जेंडर, आरोग्य, कुटुंब नियोजन, कायदेविषयक प्रशिक्षण आलूर, कदेर विभाग (कोथळी) तुगाव विभाग (नाईकनगर) येणेगुर विभाग (डाळिंब) याठीकाणी आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सर्वप्रथम ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मुरूम प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी सी.डी.पी.ओ.सौ.दूधभाते मॅडम, सौ.कांबळे मॅडम (सुपरवायझर), ॲड.फरहीन खान – पटेल, डॅा.बनसोडे मॅडम, जिजाऊ ब्रिगेडचे रेखाताई पवार, डॉ.सुवर्णा पाटील, करुणा गायकवाड, पोलीस पाटील (कोथळी) प्रिया गावडे, सौ.काबळे मॅडम (सुपरवायझर), नयना कांबळे (सरपंच मुरळी), ग्रामसेवक पोतदार मॅडम (मूरळी), ताराबाई राठोड, कविता पवार, रेश्मा चाकूरे ,शशिकला फुलारी, सुरेखा सुरवसे, रजिया मुल्ला, श्रद्धा गायकवाड, तेजस्विनी हवळे, वंदना कांबळे, अदि उपस्थित होत्या. या कार्यक्रमास किशोरी मुली, गरोदर माता, बीट मधील अंगणवाडी सर्व कार्यकर्ती, मदतनीस गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.कांबळे मॅडम (सुपरवायझर) व सुत्रसंचालन कविता पवार यांनी केले. तर आभार अनुपमा देशमुख यांनी मानले.