लोहारा :- शिवसेना ओबीसी महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रमुखपदी रमेश बारसकर यांची निवड झाल्याबद्दल क्रांती भवन मोहोळ येथे धाराशिव जिल्हाच्या वतीने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक अविनाश माळी (लोहारा), मारुती रोकडे (तामलवाडी), अमर माळी (धाराशिव), लक्ष्मण माळी (शिवसेना उप तालुकाप्रमुख तुळजापूर), योगेश देवकर (ग्रा.प. सदस्य मार्डी), श्रीशैल्य स्वामी (लोहारा), नारायण क्षिरसागर (ग्रा.प. सदस्य हिप्परगा रवा), अमोल माळी (लोहारा), सोमनाथ भोजने (फनेपुर), चंद्रकांत माळी (सावरगांव), स्वराज्य जानराव (धाराशिव), ओम कुंभार (नागराळ), ज्ञानेश्वर काडगांवे (लोहारा), मंगेश माळी (कामठी), अदि उपस्थित होते.