उमरगा :- शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाच्या वतीने महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांंना सतत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.नवीन शैक्षणिक धोरणानुसार आंतरवासिता इंटर्नशिप ची सोय केले आहे. विविध उद्योजक आणि व्यावसायिक आणि तसेच कंपन्यांना निमंत्रित केले जाते. वर्ल्ड लान्सर मेडिया सोल्युशन या डिजिटल मार्केटिंग कंपनीद्वारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मुलाखतीद्वारे निवड केली आहे. यामध्ये शिखा सल्साबिन सुजाउद्दीन, कांचन औदुंबर ब्याळे, साक्षी संजय घोडके, रेणुका अशोक वाकळे या चार विद्यार्थिनींची डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदासाठी निवड करण्यात आली. सदर विद्यार्थ्यांचे आदेश पत्र कंपनीचे प्रदीप गायकवाड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल सदर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्लेसमेंट सेलचे समन्वयक प्रा. सूर्यकांत रेवते, प्रभारी प्राध्यापक वसंत हिस्सल, वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख विनोद देवरकर, रसायनशास्त्र विभाग प्रमुख सूर्यवंशी, तसेच प्रा. बोंदर उपस्थित होते.
Home नोकरी विषयक वर्ल्ड लान्सर मीडिया सोल्युशन कंपनीद्वारे श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांची निवड