उमरगा :- लातूर- उमरगा रोडवर चौरस्ता येथे दुचाकीचा अपघात होऊन एक गंभीर जखमी झाले असल्याची घटना दि. 24 रोजी दुपारी ठीक 11:00 वाजता घडली असून, लातुर कडुन उमरग्याकडे येणारी मोटार सायकल क्रमांक MH24BQ 6815 ही उमरगा चौरस्ता येथे आली असता रोड च्या बॉरीकेट ला धडक दिल्याने बॉरीकेट चे रॉड बगलत घुसल्याने डावा हात पुर्ण निकामी झाला असुन, दुचाकी चालक रोहीत नागनाथ गोते वय 35 राहणार बसवेश्वर चौक लातुर हा गंभीर जखमी झाला आहे.यास विश्वेकर हॉस्पिटल येथे दाखल केले आहे.
दुसरा अपघात हा ,
उमरगा – बायपास रोड वरदि.24 रोजी दुपारी 12:45 वाजता मुबंई – हैद्राबाद महामार्गावरील बायपास रोड वर दुचाकी क्रमांक MH25 AB 5627 वरुन जात असताना दुचाकी चालक गफूर महेताब शेख वय 50 राहणार जकेकुर यास अचानक चक्कर आल्याने ते रोडवरच पडुन जखमी झाले असल्याची माहीती मिळताच अपघात ग्रस्ताच्या मदतीला मोफत असलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्णवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले असल्याची माहीत रुग्णवाहिका चालक शेषेराव लवटे यांनी दिली आहे.