लोहारा :- शहरातील महात्मा फुले जयंती उत्सव समीतीच्या अध्यक्षपदी गहिनीनाथ क्षिरसागर तर सचिवपदी सचिवपदी शाम क्षिरसागर यांची निवड करण्यात आली. लोहारा शहरातील महात्मा फुले युवा मंच लोहारा यांच्या वतीने शहरातील माऊली काँम्प्लेक्स येथे नगरसेवक अविनाश माळी यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले जयंती उत्सव समीतीची बैठक घेण्यात आली. यावेळी जयंती उत्सव समीती अध्यक्षपदी गहिनीनाथ क्षिरसागर, उपाध्यपदीपदी शुभम फुलसुंदर, महेश सुर्यवंशी, सचिवपदी शाम क्षिरसागर, सहसचिवपदी धिरज क्षीरसागर, कोषाध्यक्षपदी शशिकांत माळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, युवा मंच अध्यक्ष सचिन माळी, राजेंद्र क्षीरसागर, अमोल माळी, शरण फुलसुंदर, किशोर क्षीरसागर, विष्णु क्षीरसागर, सोमनाथ माळी, दिनेश माळी, श्रीकांत माळी, संजय काटे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, संदिप माळी, अशोक क्षीरसागर, अशोक काटे, गणेश माळी, संतोष क्षीरसागर, बालाजी माळी, अरुण वाघमारे, राहुल माळी, लक्ष्मण क्षीरसागर, बजरंग माळी, बाळु माळी, गजानन वाघमारे, प्रशांत माळी, बालाजी क्षीरसागर, चंद्रकांत माळी, गणेश माळी, अभिजीत माळी, समर्थ माळी, संकेत माळी, हर्षद माळी, ओंकार गवळी, ओंकार माळी, नितीन माळी, बंटी माळी, यांच्यासह युवा मंचचे सदस्य, समाजबांध मोठ्या संख्येने उपस्थित होते.