मुबंई- हैद्राबाद महामार्गावरील समाने वजन काट्याजवळ दुचाकी- पिकअप ची धडक ; दोघे जखमी 

0
227

उमरगा :- शहरापासून जवळच असलेल्या मुबंई-हैद्राबाद महामार्गावरील समाने वजन काट्याजवळ दुचाकी- पिकअप ची दि. 25 रोजी दुपारी 11:45 वाजता धडक होऊन दोघे जखमी झाल्याची घटना घडली आहे.

सविस्तर वृत्त मुंबई- हैद्राबाद महामार्गावरील समाने वजन काट्याजवळ कडदोर येथुन उमरग्याकडे येणारी मोटार सायकल क्रमांक MH 25 A F 7233 ला पाटीमागुन येणार्‍या पिकअप क्रमांक MH 25 AJ 0929 ने जोराची धडक दिल्याने त्यात डिगंबर मुकींद साळुंके वय -45, नागनाथ त्रीबंक चौधरी वय 32 दोघे राहणार कडदोरा हे जखमी झाले असून, सदर अपघाताची माहीत मिळताच उमरगा चौरस्ता येथे अपघातग्रस्ताच्या मदतीला मोफत असलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्णवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले .असल्याची माहीत रुग्णवाहिका चालक शेषेराव लवटे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here