लोहारा :- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेली उत्तरोत्तर प्रगती आणि भाजपची विचारधारा याने प्रेरित होऊन दि.25 मार्च रोजी शिवसेना (उ.बा.ठा.) गटाचे कळंब चे माजी नगराध्यक्ष किरण हौसलमल यांनी धाराशिव येथे भाजपा नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी भाजपाचे नेते माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांनी किरण हौसलमल यांचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी सुरेशजी देशमुख, रामहरी शिंदे, विकास बारकूल, गफ्फार काझी, राजाभाऊ सोनटक्के, उत्तमराव टेकाळे, आबासाहेब गायकवाड यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.