लोहारा :- शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयातील विद्यार्थी सूरज मिसाळ अग्निवीर (सैन्यभरती) झाल्याबद्दल प्राचार्य डॉ.शेषेराव जावळे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सुरज रसाळ यांनी या अग्निविर सैन्य भरतीसाठी कठोर परिश्रम व अभ्यासात सातत्य, जिद्द असल्याने मी भरती झालो आहे. अशी भावना व्यक्त केली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेषेराव जावळे पाटील यांनी सुरज यांचे मनः पूर्वक हार्दिक अभिनंदन केले आणि देश सेवेसाठी शुभेच्छा देऊन आपल्या परिवार, गावं, महाविद्यालयाचे नावं उज्वल करावे अशी भावना व्यक्त केली. या प्रसंगी प्रा डॉ.मनोज सोमवंशी, डॉ. विनोद आचार्य डॉ. भैरवनाथ मोटे, डॉ.रामेश्वर धप्पाधुळे, प्रा.दत्ता कोटरंगे डॉ.पार्वती माने, डॉ. सुर्यकांत बिराजदार, डॉ.शिरीष देशमुख, प्रविण पाटील, प्रकाश राठोड, संजय फुगटे परमेश्वर कदम, यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
Home आरोग्य व शिक्षण शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयातील विद्यार्थी सूरज मिसाळ अग्निवीर (सैन्यभरती) झाल्याबद्दल प्राचार्य डॉ.शेषेराव...