उमरगा : शहरातील दानिश मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे मालक साजीद लदाफ यांचा सात वर्षाचा मुलगा दानिश साजिद लदाफ यांने दि.27 रोजी मुस्लिम धर्मीयांच्या पवित्र रमजान महिन्यातील रोजा (उपवास)केल्याने शहरात सर्वत्र त्याचे कौतुक करण्यात येत आहे.
रमजान महिना हा मुस्लिम धर्मीयां करीता पवित्र व जास्तीत जास्त पुण्य कर्म करुन, पाप कर्मातून मुक्त होण्याची सर्वात मोठी संधी या काळात मुस्लिम अनुयायाना असते अशी श्रध्दा समस्त बांधवा मध्ये असून, यामुळे या पवित्र रमजान महिन्यात प्रत्येक मुस्लिम बांधव जास्तीत जास्त पुण्य कर्म करण्याचा अटोकाट प्रयत्न करत असतो. याचाच एक भाग म्हणून दानिश हा मुलगा वयाने लहान असून ही, रोजा करुन आपल्या परीने पुण्य कर्म करण्याचा प्रयत्न केल्यामुळे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.