उमरगा :- शहरात हिंदू-मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत सय्यद बाशा दर्गाचे उरुसाला रविवारी (३०) गुढीपाडव्यापासून सुरू होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात धार्मिक, – सांस्कृतिक, सामाजिक – कार्यक्रमाचे आयोजन करण्यात – आले आहे.
सय्यद बाशा दर्गा परिसरातील रविवारी दुपारी चार वाजता – कब्रस्तानात वृक्षलागवडीचे – कार्यक्रम होईल, सायंकाळी सात – वाजता संदल शरीफ (मिरवणूक) निघेल. सोमवारी (३१) चिराग व – ऊरूस कार्यक्रम होईल. यादिवशी = हिंदू मुस्लिम धर्मातील हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.शहरातील हजरत सय्यद बाशा दर्गा.मंगळवारी (०१) सकाळी सात वाजता जियारत होईल. दुपारी चारला जंगी कुस्तीचा फड रंगणार असून शेवटची कुस्ती पाच हजार रुपये होणार आहे. शहरासह परिसरातील भाविकांनी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन हजरत सय्यद बाशा उरूस समितीच्या वतीने करण्यात आले. या यात्रोत्सवासाठी समितीचे अध्यक्ष जाहेद मुल्ला, उपाध्यक्ष सय्यद मुल्ला, असलम शेख, सत्तार मुल्ला, महेबुब मुल्ला, अविनाश काळे, राजु कुंभार, रसुल शेख, बबलू बलसुरे, निसार मुल्ला आदीं परिश्रम घेत आहेत.