विश्वासातून प्रगतीकडे- श्री सिद्धीविनायक परिवाराचा येरमाळा येथे सीएनजी पंप 

0
119

 

लोहारा :- येरमाळा येथील श्री सिद्धिविनायक परिवाराच्या पेट्रोल पंपावर पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सीएनजी इंधनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते व विकास बारकुल, मदन बारकुल, खंडेराव मैंदाड यांच्या उपस्थिती मध्ये हा समारंभ पार पडला. सीएनजी इंधनाच्या उपलब्धतेमुळे स्थानिक वाहनचालकांना स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि किफायतशीर इंधनाचा लाभ मिळेल. श्री सिद्धिविनायक परिवाराने या नव्या सुविधेसाठी पुढाकार घेतल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सीएनजी इंधनाच्या वापरामुळे कार्बन उत्सर्जनात घट होऊन पर्यावरण संरक्षणास हातभार लागेल. तसेच, पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी अधिक किफायतशीर असल्याने वाहनचालकांच्या इंधन खर्चात बचत होईल. सर्व सीएनजी वाहन धारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सिद्धिविनायक परिवारातर्फे करण्यात आले आहे. यावेळी मकरंद पाटील, शिवाजीराव गिड्डे पाटील, बालाजी कोरे, गणेश कामटे, धनंजय गुंड, मंगेश कुलकर्णी, राजेश पौळ आणि परिवारातील इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here