लोहारा शहरासह तालुक्यात रमजान ईद निमित्त ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी इदुल फीत्रची नमाज अदा केली

0
65

लोहारा :-  शहरासह तालुक्यात रमजान ईद निमित्त ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी इदुल फीत्रची नमाज अदा केली. लोहारा शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम धर्मगुरु शहा हुसेन अबुल कादरी (फज्जू साहेब) यांच्या नेतृत्वाखाली इदुल फीत्रची नमाज अदा केली. यावेळी नगरपंचायतीच्या वतीने ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यासाठी मंडपची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने सहाय्यक पो.नि. ज्ञानेश्वर कुकलारे व नगरपंचायतचे कार्यालयीन अधिक्षक मनोज खराडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरपंचायतीच्या वतीने माजी गटनेते अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष अमिन सुंबेकर, पोलिस उपनारीक्षक विनोद जोकार, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, कार्यालयीन अधिक्षक मनोज खराडे, पं. स. माजी सदस्य दिपक रोडगे, अदिंनी मुस्लिम बांधवाना नमाज पठन झाल्यानंतर ईदगाह मैदानावर गुलाबाचे फुल देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. मुस्लिम बांधवांच्या घरी हिंदु बांधवांनी गुलगुला, शुरखुंबा, भज्जे, याचा आस्वाद घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here