लोहारा :- तालुक्यातील जेवळी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या श्री गुरू सिध्देश्वर विरक्त मठाचे वास्तु पूजन, लोकार्पण व विरभद्रेश्वर मंदिर कळसारोहण कार्यक्रम पार पडत आहे. या निमित्त येथे आठवडाभर शिव कथाकार हरीहरानंद भारती स्वामीजी (धारुर) यांचा शिव कथा कार्यक्रम आयोजित केला असून सोमवारी दि.३१ मार्च रोजी या शिव कथेचे उद्घाटन माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख म्हणुन शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह अनेक शिवाचार्य व मठाधीश उपस्थित होते. जेवळी येथे लोकवर्गणीतून बांधण्यात आलेल्या श्री गुरुसिद्धेश्वर विरक्त मठाचे सोमवारी (ता.७) रंभापुरी महापिठाचे जगद्गुरु डॉ. प्रसन्ना रेणुकावीर सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी व काशी महापिठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत मठाचे वास्तु पूजन, लोकार्पण व श्री विरभद्रेश्वर मंदिर कळसारोहण कार्यक्रम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान येथे एक आठवडाभर ३१ मार्च ते ६ एप्रिल या काळात दररोज दुपारी तीन ते सायंकाळी सहा शिव कथाकार हरीहरानंद भारती स्वामीजी (धारुर) यांचा शिवकथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (ता.३१) या शिव कथेचे शुभारंभ माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री ष.ब्र सिद्धाराम शिवाचार्य महास्वामीजी (हरसुर) हे होते. यावेळी माजी आमदार ज्ञानराज चौगुले, मनीप्र जयशांलिंग महास्वामीजी (हिरेनागाव), मठाधीश मनिप्र गंगाधर महास्वामीजी, शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी (अणदूर), शंभूलिंग शिवाचार्य महास्वामीजी (उदगीर), शिवमूर्ती शिवाचार्य (देवापूर), धनलिंग रुद्रमुर्ती शिवाचार्य (राजेश्वर), राजशेखर शिवाचार्य (कलबुर्गी), जडीबसवलिंग शिवाचार्य (केसरजवळगा), शिवानंद शिवाचार्य (बिलगुंदी), रेवणसिद्धेश्वर शिवाचार्य (रटकल), दिगंबर शिवाचार्य (वसमत), लातूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बसवराज कारभारी, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, काँग्रेसचे तुळजापूर तालुकाध्यक्ष रामचंद्र अलुरे, पंचायत समितीचे माजी सभापती बुद्धिवंत साखरे, नगराध्यक्ष वैशाली खराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे आदीसह मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची उपस्थिती होती.