विद्यार्थ्यांनी समाजाचे जलदूत बनावे – प्राचार्य डॉ संजय अस्वले

0
26

 

उमरगा :- शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय  येथे दि. 02 रोजी आयोजित करण्यात आलेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना जल व्यवस्थापनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना समाजात जलदूत म्हणून कार्य करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या वेळी महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ विलास इंगळे कला शाखेचे उपप्राचार्य डॉ पद्माकर पिटले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी महाविद्यालयातील जलसाक्षरता कक्षाचे अध्यक्ष डॉ संतोष सुरवसे, डॉ समाधान पसारकल्ले, डॉ एच डी मुगळे, डॉ सी डी करे, डॉ एस टी तोडकर आदी उपस्थित होते. श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात जलसाक्षरता कक्षा तर्फे जल दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात पोस्टर स्पर्धेमध्ये सुरवसे सुरज शंकर प्रथम जीवनगे ऋतुजा राजेंद्र द्वितीय कांबळे वैष्णवी दयानंद तृतीय रांगोळी स्पर्धेमध्ये चव्हाण प्राजक्ता विष्णू प्रथम सुरवसे सुर्यशंकर द्वितीय जीवनगे ऋतुजा राजेंद्र व कांबळे संघप्रिया तृतीय निबंध स्पर्धेमध्ये हळनुरे पद्मिनी गणपत प्रथम पवार सौंदर्य नेताजी द्वितीय घोडके साक्षी संजय तृतीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये सुरवसे अनिशा अशोक प्रथम पटेल मेहताब समदानी द्वितीय पाचंगे अर्जुन माधव तृतीय आलेला आहे. वरील विद्यार्थ्यांचा बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अनिल देशमुख यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here