लोहारा:- आ.अभिमन्यु पवार यांच्या पाठपुराव्यामुळे “कर्नाटक राज्य सीमा (जाजन मुगळी) – एसएच 240 कासार सिरसी – बडूर – कासार बालकुंदा – एसएच 237 (तांबाळा)” या 21 किमी लांबीच्या रस्त्याच्या रुंदीकरण व सुधारणा कामासाठी केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी अंतर्गत 31 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी मंजुर केल्याने देशाचे कर्मयोगी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आ.अभिमन्यु पवार यांनी मनः पुर्वक आभार मानले आहे. सदरील रस्ता कासार सिरसी मंडळातील दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा असून या कामाचा सिरसी मंडळातील अनेक गावांना फायदा होणार आहे, अशी माहिती आ.अभिमन्यु पवार यांनी दिली.