लोहारा:- प्राचार्य डॉ.रमेश दापके सर यांच्या अमृत महोत्सवी वर्षा मध्ये रुरल चेंबर ऑफ कॉमर्स, धाराशिव शाखेच्या वतीने औद्योगिक चर्चा सत्राचे आयोजन दि.5 एप्रिल रोजी सकाळी 11:30 वाजता. दुसरा मजला, सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स, काकडे प्लॉट धाराशिव येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतुल घुईखेडकर रुरल राष्ट्रीय अध्यक्ष चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया, प्रमुख उपस्थिती संतोष टाले कार्यकारी संचालक कुसुमराम एग्रो प्रोसेसिंग कं. बुलधाना, मा. प्राचार्य रमेश दापके सर सचिव श्री.कुलस्वामी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव, अंबादास घोटेकर कार्यकारी संचालक लेजेंड एरिगेशन नाशिक, सुनिल पाटील कार्यकारी संचालक लेजेंड एरिगेशन नाशिक, प्रज्ञात तिवेदी कार्यकारी संचालक इ व्हीकल अल्बेडो व्हिजन प्रा. लि. मुंबई, चेतन पवार कार्यकारी संचालक ऑलिगन इंडस्ट्रीज नाशिक, उत्तमराव शिंदे सेंद्रिय शेतीतज्ञ छत्रपती संभाजीनगर , उदयसिंह दळवी कार्यकारी संचालक मल्टी लिंक सेल्स अॅड. सर्व्हिसेस पुणे, जयंत पाटील कार्याध्यक्ष रुरल चेअरमन ऑफ कॉमर्स इंडिया, अजिंक्य अतकरे सेंद्रिय शेतीतज्ञ छप्रपती संभाजीनगर, स.के.जारवाल सेंद्रिय शेतीतज्ञ छप्रपती संभाजीनगर, शिवाजी देशमुख कार्यकारी संचालक शिवांजली आर्युवेर्दिक हेअर ऑईल कं. वाशिम उपस्थित राहणार आहेत. नवोदित उद्योजक, तरुणांना उद्योगासाठी मार्गदर्शन, रोजगाराच्या संधी, उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासंदर्भातील शासकीय कार्यालयीन अडचणी व त्या सोडवण्यासाठीचे मार्गदर्शन, व्यवसायासाठी वित्तीय पुरवठा मार्गदर्शन, स्कील डेव्हलपमेंट बद्दल मार्गदर्शन, भविष्यातील उद्योग जगतातील संधी, व्यवसाय का सुरू करावा – कसा सुरू करावा – व्यावसाय वाढ कशी करावी याबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास युवकांनी उपस्थित रहावे, असे आवाहान आयोजक-रुरल चेंबर ऑफ कॉमर्स इंडिया यांनी केले आहे.