लातुर- गुलबर्गा रोडवरील आयशर शोरुम जवळ ऑटो- ट्रक चा भीषण अपघात; एकजण गंभीर जखमी 

0
335

उमरगा :- जकेकुर चौरस्ता पासून जवळच हकेच्या अंतरावर लातूर- गुलबर्गा रोडवर असलेल्या आयशर शोरूम जवळ ऑटो- ट्रक चा भीषण अपघात होऊन एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. 5 रोजी दुपारी ठीक 12:50 वाजता घडली आहे.

 

लातुर – गुलबर्गा रोडवरील भीषण अपघात गुलबर्गा येथुन उमरग्याकडे येणारी ट्रक क्रमांक HR 47 G 1101 ने उमरगा येथून गुलबर्गा रोड ने जाणार्‍या भारत गॅस च्या ऑटोला जोराची धडक दिली. आर्धा तासाच्या प्रयत्नाने ऑटो चालकाला बाहेर काढण्यात आले असून, ऑटो चालक अनिल भीम सुर्यवंशी वय -39, राहणार – जहागीर (चींचोली) गंभीर जखमी चे असे नाव आहे.

सदर अपघाताची माहीती मिळताच उमरगा चौरस्ता येथे आहोरात्र आपघात ग्रस्ताच्या मदतीला मोफत असलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्णवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला विश्वेकर हॉस्पिटल उमरगा येथे दाखल केले करण्यात आले असल्याची माहीती रुग्णवाहीका चालक शेषेराव लवटे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here