माकणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अभिजित माकणीकर तर उपाध्यक्ष सचिन गायकवाड

0
166

 

 

लोहारा :- तालुक्यातील माकणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीची बैठक किशोर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

 

यावेळी बैठकीत सर्वानुमते चर्चा करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीची अध्यक्षपदी अभिजित माकणीकर, उपाध्यक्षपदी सचिन गायकवाड, सचिवपदी सागर जाधव, सहसचिवपदी आकाश कांबळे, कोषाध्यक्षपदी रोहित गायकवाड, सकोषाध्यक्षपदी सुमित जाधव, संघटकपदी कृष्णा कांबळे, मिरवणूकपदी प्रमुख अनिरुद्ध जाधव, मिरवणूकपदी प्रमुख अविनाश कांबळे, सहसंघटकपदी सुरज गायकवाड, आधारस्तंभ किशोर गायकवाड, स्वपनील जाधव, मार्गदर्शक धोंडीराम कांबळे, यांची निवड करण्यात आली. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here