उमरगा :- तालुक्यातील कोरेगाववाडी शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज ऑफ फार्मसी, येथे व्यक्तिमत्व विकास व संवाद कौशल्य तसेच मुलाखत तयारी याबद्दल कार्यशाळा दि.5 रोजी आयोजित करण्यात आली. यावेळी पॅसिफिक्स रिसर्च, पुणे येथील वरिष्ठ प्रशिक्षक संजित ढवळे, व्यवसाय सल्लागार व संवाद कौशल्य प्रशिक्षीका रविना कांबळे यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती. तसेच संस्थेचे अध्यक्ष बी.एच. बेडदुर्गे, सचिव डॉ.विजय बेडदुर्गे, उपाध्यक्ष प्रा.अजय बेडदुर्गे यांची उपस्थिती होती. यावेळी संजित ढवळे विद्यार्थ्यांना मुलाखत तयारी विषयी मार्गदर्शन केले. पदवी पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांनी मुलाखतीची तयारी करावी. आपली ताकत, कमजोरी, संधी यावर कार्य करावे. वेळेचे नियोजन करावे. परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची क्षमता असावी. सतत सकारात्मक विचार आत्मसात करावेत. मुलखतीसाठी जात असताना व्यवस्थित पोशाख असावा. विदयार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे. वैयक्तिक माहिती व ईमेल आयडी कशी बनवावी याबद्दल माहिती दिली. आत्मविश्वासाने मुलाखतीस सामोरे जावे असे त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तररीत्या मार्गदर्शन केले.
रविना कांबळे यांनी व्यक्तिमत्व विकास व संवाद कौशल्य याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुलाखती करिता संवाद कौशल्य चांगले असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच समाजामध्ये कार्य करत असताना सुद्धा संवाद कौशल्य महत्वपूर्ण ठरते. विद्यार्थ्यांनी वाचनावर भर द्यावा. माहिती व ज्ञान मिळवण्यासाठी सतत धडपड करावी. महाविद्यालयात होणाऱ्या सांस्कृतिक व इतर कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा. जेणेकरून संवाद कौशल्यामध्ये सुधारणा होईल. कविता, गायन, खेळ यासारखे छंद जोपासावेत.व्यक्तिमत्व विकास व संवाद कौशल्य हा यशाचा पाया आहे असे यावेळी रविना कांबळे म्हणाल्या. यावेळी प्राचार्य महेश कदारे, डॉ.अश्विनी सुर्यवंशी, प्रा.परीक्षित शिरूरे, प्रा.किरण पांचाळ, प्रा.फुलचंद काजळे, प्रा. श्रीकृष्ण मुळे, प्रा.धनश्री भुजंगे, प्रा.अंकिता यादव, प्रा.शितल शेळके, प्रा.अशोक गायकवाड, प्रा. वैष्णवी फुगटे, प्रा.प्राजक्ता ननावरे, प्रा. अंकिता वडजे, प्रा.मंजुषा गव्हाळे, प्रा.ओमकार पाटील व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. संतोष जाखोटीया यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.