धाराशिव :- जिल्हा मजूर सहकारी संघाच्या संचालकपदाच्या 9 जागासाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने 8 जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळविले आहे. 4 जागा बिनविरोध झाल्या होत्या. भारतीय जनता पार्टीचे परंडा तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव यांच्या पत्नी सौ. लताताई जाधव या महिला मतदारसंघातून सर्वाधिक मताने विजयी झाल्या. त्यांचा परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात भाजपाचे नेते माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या वतीने सत्कार करुण शुभेच्छा देण्यात आल्या. सर्व नवनिर्वाचित संचालकांचे माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.